Wednesday, 24 January 2018

स्वप्न

स्वप्न हे पर्वतच्या ट्रैकिंगसारखा असते ते पूर्ण करन्यासाठी हिम्मत जिद्द चिकटी लागते आनी ते पूर्ण करनारि खुप कमी जन असतात तर काहिजण अपयशी ठरतात ह्या जगात प्रत्येक मानुस हा आपल्या आयुश्याच्या career च्या, तर कोनी प्रेमाच्या releted स्वप्न बघत असतो काहिंचे स्वप्न पूर्ण होतात तर काहिंचे अपुर्न राहतात.पण जो माणुस स्वप्नांना घेऊन जगत असतो तो खरा माणूस.
                          माझ्या आयुष्यात सुद्धा असच एक स्वप्न घेऊन जगत होतो.लहानपणापासुन मी  हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट खूप पाहायचो आणि ते पाहून पाहून मला त्या चित्रपटांची गोडी निर्माण झाली.आणि आणि महत्त्वाचं असं की माझी बहिण आणि भाऊ हे सुद्धा Film city मध्ये आधीच काम करत असल्याने ते पाहून अस वाटायचं की मी कधी ह्यांच्या सोबत करणार.एक दिवस असा आला की ताईने मला एका set वर घेऊन गेली पोहचत्याक्षणी मी शांत झालो. कारण माझ्या समोर मी पाहिलेलं स्वप्न उभं होत. मी तो set फिरत असताना माझी नजर त्या Camera कडे गेली आणि त्यांच काम बघुन मी ठरवलं की मोठ्यापणी मला Cameraman बनायचं आहे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासठी खूप मेहनत केली. आणि ह्या मेहनती मधून मला माझे फळ मिळाले.
                                                

                             मला पहिली संधी गेल्या मे महिन्यात सब टी.व्ही  वरील "त्रिदेवी" या मालिकेतून मिळाली.
तो पहिला दिवस कधीच विसरू शकत नाही. ते ते मोठ मोठे सेट,त्या Lights,तो Sound,camera rolling,sound Action असा आवाज, हा ...... अस बर वाटल ना..... अस वाटत होता कि मी पाहिलेलं स्वप्न मी प्रत्यक्षात अनुभवत होतो . त्या नंतर "माझ्या नवऱ्याची बायको" "फुलपाखरू" अशा मालिका मी केल्या. आणि हा हे काम करत असताना मी स्वप्न बघून जगात होतो. वेगवेगळे अनुभव अनुभवायला मिळाले. इतर अभिनेत्री अभिनेता ह्याच्याशी संवाद साधायला मिळाले. त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले .
                                        स्वप्न बघून ,दिवस रात्र मेहनत करून ती सत्यात उतरली कि जे समाधान मिळत या सारख दुसर सुख कश्यातच नाही.... पण हेच आपला आवडीच काम करत असताना आपले पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत,आपल्या मोठ होण्यात ज्या ज्या व्यक्तीचा हात आहे त्यांना नेहमी सोबत घेऊन जाव   

Monday, 22 January 2018

My first journey to hyderabad

वर्ल्ड टूर हा शब्द ऐकताच प्रत्येक व्यक्तीच्या मनात उत्सुक्ताची भावना निर्माण होते. कोणाच्या मनात ट्रॅकिंग ची,तर कोणाच्या मनात नुसती भटकंती करत नवीन जागा शोधण्याची, तर काहींना challanging करून दाखवण्याची उत्सुकतेची भावना निर्माण होते मी हे त्यातला एक जो हेच स्वप्न घेऊन जगत होतो ज्या स्वप्नाची मी आतुरतेने वाट बघत  होतो व ते स्वप्न जगावंसं वाटत होता ते प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात चालून आल आणि ती म्हणजे My first journey to Hyderabad.... 
                            हे ऐकताच खूप भारी वाटलं आणिकही दिवसांनी मला Hyderabad tour  ची दिनांक मिळाली मी खूप excited झालो. मी माझ्या तयारी ला लागलो. बघता बघता तो दिवस तो क्षण आला हैदराबाद ला जाण्यासाठी मी माझ्या ग्रुपसोबत विटी स्टेशनला येऊन पोचलो. आणि दोन मिनिटे शांत झाच लो मला अजूनही विश्वास बसत नव्हता कि मी ह्या ग्रुपसोबत हैदराबाद ला Travel shoot साठी जातोय. मग काही वेळाने ट्रेन प्लेटफ्रॉम नं ५ ला आली. जसजसा मी ट्रेन जवळ जात होतो तसतस मला भीती वाटली कि मी हे Travel shoot करू शकेन का? पण असं बोलतात ना life मध्ये  Risk घेतल्याशिवाय life ची मज्जा कुछ औरच असते.मग मी ट्रेन मध्ये बसलो  आणि ट्रेन  हैदराबाद ला जाण्यास निघाली.आमचा ग्रुप हा ८० जणांचा होता मग ते मजामस्ती करू लागले,गाण्यांच्या भेंड्या खेळू लागले आणि ते खेळत असताना त्यांचे आनंदाचे क्षण माझ्या कॅमेरात टिपू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० च्या सुमारास हैदराबाद स्टेशनला पोहचलो पोचल्याक्षणी एक वेगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसला तो म्हणजे त्या स्टेशनवर एकही कागदाचा तुकडा पडलेला दिसत नव्हता स्टेशन वरून बाहेर पडल्यानंतर दोन बसेस आम्हाला pickup करण्यासाठी आल्या मग आम्ही हॉटेल ला येऊन पोहचलो आणि नंतर आम्ही golkonda fort, light sound show, hussian lake sager, zoological park, ramoji filmcity  इ. ठिकाणी फिरलो मज्जा केली. तो माझ्या जीवनात ला न विसरता येणारा क्षण होता..