Wednesday, 24 January 2018

स्वप्न

स्वप्न हे पर्वतच्या ट्रैकिंगसारखा असते ते पूर्ण करन्यासाठी हिम्मत जिद्द चिकटी लागते आनी ते पूर्ण करनारि खुप कमी जन असतात तर काहिजण अपयशी ठरतात ह्या जगात प्रत्येक मानुस हा आपल्या आयुश्याच्या career च्या, तर कोनी प्रेमाच्या releted स्वप्न बघत असतो काहिंचे स्वप्न पूर्ण होतात तर काहिंचे अपुर्न राहतात.पण जो माणुस स्वप्नांना घेऊन जगत असतो तो खरा माणूस.
                          माझ्या आयुष्यात सुद्धा असच एक स्वप्न घेऊन जगत होतो.लहानपणापासुन मी  हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट खूप पाहायचो आणि ते पाहून पाहून मला त्या चित्रपटांची गोडी निर्माण झाली.आणि आणि महत्त्वाचं असं की माझी बहिण आणि भाऊ हे सुद्धा Film city मध्ये आधीच काम करत असल्याने ते पाहून अस वाटायचं की मी कधी ह्यांच्या सोबत करणार.एक दिवस असा आला की ताईने मला एका set वर घेऊन गेली पोहचत्याक्षणी मी शांत झालो. कारण माझ्या समोर मी पाहिलेलं स्वप्न उभं होत. मी तो set फिरत असताना माझी नजर त्या Camera कडे गेली आणि त्यांच काम बघुन मी ठरवलं की मोठ्यापणी मला Cameraman बनायचं आहे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासठी खूप मेहनत केली. आणि ह्या मेहनती मधून मला माझे फळ मिळाले.
                                                

                             मला पहिली संधी गेल्या मे महिन्यात सब टी.व्ही  वरील "त्रिदेवी" या मालिकेतून मिळाली.
तो पहिला दिवस कधीच विसरू शकत नाही. ते ते मोठ मोठे सेट,त्या Lights,तो Sound,camera rolling,sound Action असा आवाज, हा ...... अस बर वाटल ना..... अस वाटत होता कि मी पाहिलेलं स्वप्न मी प्रत्यक्षात अनुभवत होतो . त्या नंतर "माझ्या नवऱ्याची बायको" "फुलपाखरू" अशा मालिका मी केल्या. आणि हा हे काम करत असताना मी स्वप्न बघून जगात होतो. वेगवेगळे अनुभव अनुभवायला मिळाले. इतर अभिनेत्री अभिनेता ह्याच्याशी संवाद साधायला मिळाले. त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले .
                                        स्वप्न बघून ,दिवस रात्र मेहनत करून ती सत्यात उतरली कि जे समाधान मिळत या सारख दुसर सुख कश्यातच नाही.... पण हेच आपला आवडीच काम करत असताना आपले पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत,आपल्या मोठ होण्यात ज्या ज्या व्यक्तीचा हात आहे त्यांना नेहमी सोबत घेऊन जाव   

2 comments:

  1. सुंदर विचार. मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केलेले काम नेहमीच समाधान आणि योग्य मोबदला देऊन जाते. संधीची वाट बघत रहा आणि ती मिळताक्षणी तिचे सोने कर. लातूर ठेव जो काम करत रहातो तोच त्यातुन शिकत जाऊन पुढे खुप मोठा होतो. मोठा झाल्यावर मात्र ह्या प्रवासात जे जे तुझ्याबरोबर होते त्यांना कधीही विसरू नकोस. तुझ्या विचारात आणि कृतीमध्ये सदैव सकारात्मकता ठेव. स्वतःवरच विश्वास कधीही ढळू देऊ नकोस. कारण तोच कठीण समयी तुला कमीतकमी त्रासात तुला सुखरूप ठेवेल

    ReplyDelete